Thu, Jul 18, 2019 10:10होमपेज › Belgaon › बेळगावात सर्वात मोठे मतमोजणी केंद्र

बेळगावात सर्वात मोठे मतमोजणी केंद्र

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 8:06PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकातील कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक 18 विधानसभा मतदारसंघ आहेत. या सर्व मतदारसंघातील मतमोजणी एकाच केंद्रात म्हणजे आरपीडी महाविद्यालयात होत असल्याने हे केंद्र राज्यातील सर्वात मोठे ठरले आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी (दि. 12) मतदान होत असून 15 रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यातील सर्व 222 मतदारसंघातील मतमोजणीसाठी एकूण 38 केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सर्व केंद्रांत एकाचवेळी मत मोजणीला सुरूवात होईल. 

बेळगाव जिल्ह्यातील अठरा मतदारसंघातील मतमोजणी आरपीडी कॉलेजमध्ये होणार आहे. प्रत्येकी एक याप्रमाणे अठरा खोल्यांमध्ये मत मोजणी होणार आहे. राज्यात कोणत्याही ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारसंघ नाहीत की एवढ्या खोल्या नाहीत. कोडगू जिल्ह्यात केवळ दोनच मतदारसंघ असून या जिल्ह्यात सर्वात लहान मतमोजणी केंद्र असणार आहे.