Tue, Sep 25, 2018 04:46होमपेज › Belgaon › बाप्पांचे आगमन होतेय वाजतगाजत

बाप्पांचे आगमन होतेय वाजतगाजत

Published On: Sep 13 2018 1:42AM | Last Updated: Sep 13 2018 12:18AMबेळगाव : प्रतिनिधी

मुंबई-पुणेबरोबर बेळगावात देखील लाडक्या बाप्पाचे आगमन गणेशोत्सवाच्या अगोदर होत आहे. महिनाभरापासून सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाच्या स्वागताच्या तयारीत गुंतले आहेत. ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक पध्दतीने आकर्षक वेशभूषा करुन सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा कल वाढीस लागला आहे. 

बेळगावात अलीकडे गणेशोेत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर श्रीमूर्ती गणेशचतुर्थी अगोदर आणण्याकडे कल वाढत आहे. मुंबई, पुणे येथे वाहतूक  समस्येला कंटाळून सुमारे 15 दिवस अगोदरच गणेशमूर्ती आणण्याची प्रथा पडली. श्रीमूर्ती आणताना ती वाजतगाजत आणण्यासाठी ढोल, ताशा पथक याचा वापर करण्यात येऊ लागला. त्यासाठी आकर्षक गणवेशदेखील कार्यकर्ते करु लागले आहेत. अलीकडे आकर्षक फेटे, टोप्या, गणपतीचे फोटो असलेले टीशर्ट, खादी ड्रेस घालण्याकडे कल वाढला आहे. 
युवक- युवतींमध्ये बाप्पाच्या आगमनाविषयी उत्साह दिसून येत आहे. बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी ड्रेसकोडवर ते लक्ष देतात. 

वाजत गाजत बाप्पा मंडळाच्या नियोजित ठिकाणी विराजमान झाला आहे.  सोशल मीडियावरही  बाप्पाच्या मिरवणुकीची छायाचित्रे व व्हीडीओ व्हायरल होत आहेत. त्याबरोबर गल्लोगल्ली बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असून त्यांच्या स्वागताच्या कमाणी उभारल्या आहेत.