Sun, Aug 25, 2019 12:58होमपेज › Belgaon › बेळगाव : बळ्ळारी नाल्यात पूरसदृश स्थिती जैसे थे

बेळगाव : बळ्ळारी नाल्यात पूरसदृश स्थिती जैसे थे

Published On: Jul 16 2018 1:24AM | Last Updated: Jul 15 2018 11:30PMबेळगाव : प्रतिनिधी

वर्षभरापासून बळ्ळारी नाला चर्चेत आला आहे. या नाल्यात झालेले अतिक्रमण, गाळ, जलपर्णी, विविध ठिकाणी टाकण्यात आलेले भराव यामुळे नाल्याच्या रुंदीत कमालीची घट झाली आहे. नाल्याच्या बाजूने 14 गावाची शेती आहे. नाल्याची पूरसदृश स्थिती जैसे थे आहे. दोन दिवसात आ.  अभय पाटील यांच्याकडून नाल्याची पाहणी करणार आहेत. 

नाला प्रकरणी शेती बचाव समिती शेतकरी संघटनेने विविध खात्याकडे पाठपुरावा केला आहे. बंगळूर लोकायुक्त न्यायालयात प्रकरण असून आतापर्यंत तीन तारखा पडल्या आहेत. बेळगावच्या तहसीलदार मंजुळा नायक यांना कारणे दाखवा नोटीस लोकायुक्तांनी बजावली आहे. त्या अहवालात काय मांडतात, याकडे शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. 31 ऑगस्ट रोजी लोकायुक्त न्यायालयात सुनावणी बंगळूरला होणार आहे. त्यासाठी बेळगावहून शेती बचाव समिती शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी वकिलांना नेऊन आपली बाजू मांडण्याकरिता बंगळूरला जाण्याची तयारी करीत आहेत. आ. पाटील यांच्याकडे आठवडाभरापूर्वी शेतकर्‍यांनी बळ्ळारी नाला अतिक्रमण प्रकरणी दाद मागितली होती. यापूर्वी जिल्हाधिकार्‍यानासुध्दा निवेदना देऊनअतिक्रमण हटविण्याची सूचना केली आहे. याची दखल आमदारांनी घेतली असून दोन दिवसात नाल्याची पाहणी करणार आहेत. नाल्यात पाणी थांबून राहिल्याने अनगोळ, येळ्ळूर व वडगाव शिवारात पाणी फुगले आहे. या पाण्याचा वेळीच निचरा झाला नाही तर पिके कुजण्याची शक्यता शेतकरी व्यक्‍त करतात.