Mon, Aug 26, 2019 01:47होमपेज › Belgaon › जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक यादीचे काम जोमात

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक यादीचे काम जोमात

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 07 2018 10:33PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करण्यात येत आहे. शिक्षण खात्यातर्फे सरकारी व अनुदानित शाळांतील  अतिरिक्त शिक्षकांची यादी करण्याचे काम सुरू आहे. शिक्षण खात्याने 2017-18 च्या पटसंख्येनुसार यादीचे काम जोमात सुरू झाले आहे. शिक्षण खात्यने आता बीआरपी व बीआरसी यांना काम सोपविले आहे. 

सरकारी व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटत आहे. यामुळे शाळांतून अतिरिक्त शिक्षक आहेत. त्या शिक्षकांची यादी तयार करण्यात येत आहे. अतिरिक्त शिक्षकांची बदली करण्यात येणार आहे. सरकारी शाळांतील शिक्षकांची बदली अधिक पटसंख्या असलेल्या शाळांतून करण्यात येणार आहे. बेळगाव शहर, ग्रामीण, खानापूर, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग येथील तालुक्यातील शिक्ष़ण संयोजक सर्व मांहिती गट शिक्षणाधिकारी यांच्याक़डे सुपूर्द करणार आहेत. गटशिक्ष़णाधिकारी जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकड़े माहिती पाठवून देणार आहेत.

अतिरिक्त शिक्षकांची बदली ऑनलाईन कौन्सिलिंगद्वारे होणार आहे. यासाठी सर्व माहिती संग्रहित केली जात आहे. बंगळूर येथून ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. काही शाळांची पटसंख्या अधिक आहे. मात्र शिक्षक नाहीत. अशी परिस्थिती शाळांची झाली आहे.  दोन वषार्ंपूर्वी शिक्षण खात्याने बेळगावातील सरकारी प्राथमिक शाळांतील शिक्षकांची बदली खानापूर तालुक्यात करण्यात आली. त्यावेळी अनेक शिक्षकांनी व शिक्षक संघटनेने विरोध केला. काही शिक्षक बदलीच्या ठिकाणी जाण्यास इच्छुक नाहीत. कारण खानापूर जंगलमय भागात महिला शिक्षकांची बदली केल्यास अनेक ठिकाणी वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे बदलीच्या ठिकाणी जाण्यास त्या इच्छुक नव्हत्या. अखेर शिक्षण खात्याने बदलीची आर्डर घेतली नाही तर कारवाई केली जाईल, असा इशारा देताच शिक्षकांनी बदली ऑर्डर घेतली. खानापूर तालुक्यात सुमारे 135 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे शिक्षकांची नेमणूक करा, ़अशी मागणी होत आहे.