होमपेज › Belgaon › मादक पदार्थ विक्री करणार्‍याला अटक

मादक पदार्थ विक्री करणार्‍याला अटक

Published On: Sep 02 2018 1:10AM | Last Updated: Sep 01 2018 11:10PMबेळगाव : प्रतिनिधी

शिवाजीनगर परिसरातील जेल कॉलनी येथील मराठी शाळेजवळ पन्नीसारख्या मादक वस्तूंची विक्री करणार्‍याला मोहम्मद तौशिफ बशीरअहमद ख्वाजा (वय 37, रा. आसारखान सोसायटी, वीरभद्रनगर, चौथा क्रॉस) याला अटक करण्यात आली आहे. 

शहरात होणार्‍या अमली पदार्थांच्या विक्रीवरून पोलिस खात्याच्या कारभारावर प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी विशेष मोहीम उघडली आहे. शिवाजीनगर परिसरात पन्नीसारख्या अमली 

पदार्थांची व्रिकी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून छापा टाकून कारवाई करताना मोहम्मदकडून 31 हजार 800 रुपये किमतीचा पन्नी हा मादक पदार्थ, 27 हजार 600 रुपये रोख, 25 लाईटर, सात रेल्वे तिकिटे, तसेच पन्नी या मादक वस्तूच्या सेवनासाठी वापरण्यात येणारे सिगारेटसदृश्य कागद तसेच अल्युमिनियम पाईप जप्त करण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षक बी. आर. गड्डेकर, उपनिरीक्षक जयश्री माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.