होमपेज › Belgaon › आतापर्यंत दीड हजारांवर उमेदवारांनी आजमावला कौल

आतापर्यंत दीड हजारांवर उमेदवारांनी आजमावला कौल

Published On: Apr 24 2018 1:05AM | Last Updated: Apr 24 2018 12:36AMबेळगाव : प्रतिनिधी

राज्याच्या राजकारणात  बेळगावला विशिष्ट स्थान आहे. बंगळूर  वगळता सर्वाधिक मतदारसंघ असलेला जिल्हा म्हणून बेळगावकडे पाहिले जाते. अशा जिल्ह्यात आतापर्यंत 13 निवडणुका झाल्या असून आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 1,681 उमेदवारांनी मतदारांचा कौल आजमावला आहे.

बंगळुरात 28 तर बेळगाव जिल्ह्यात 18 मतदारसंघ आहेत. मतदारसंघांची पुनर्रचना होण्यापूर्वी  18   मतदारसंघ होते. पुनर्रचनेनंतरही तेवढेच आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांचे विभाजन करण्यात आले. मात्र बेळगावचे विभाजन झाले नाही. त्यामुळे मतदारसंघही अठराच राहिले.जिल्ह्यामध्ये 1957 पासून आतापर्यंत 13 वेळा (काही मतदारसंघात पोटनिवणुका वगळता) सार्वत्रिका निवडणुका झाल्या. पहिल्या निवडणुकीत 18 मतदारसंघासाठी केवण 39 उमेवार होते. 013 मधील निवडणुकीसाठी 192 उमेदवार होते. 

बेळगाव उत्तरमध्ये एक पोटनिवणुकीसह (1992) एकूण 14 वेळा निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांतून 402 उमेवार रिंगणात होते.  विशेष म्हणजे 1985 मधील निवडणुकीत 301 उमेदवार रिंगणात होते. यावेळी  मोठ्या आकारातील मतपत्रिका मुद्रीत करण्यात  आली होती.

मतदारसंघांच्या नावात बदल 

सध्याच्या सौंदत्ती मतदारसंघाला पूर्वी परसगड म्हटले जायचे. बेळगाव शहर मतदारसंघाला आता बेळगाव उत्तर व बेळगाव दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण  म्हणून ओळखले जात आहे. तर गोकाक? 1 हे गोकाक , गोकाक? 2   हे अरभावी, संपगाव? 1 हे बैलहोंगल , संपगाव? 2 हे कित्तूर मतदारसंघ म्हणून ओळखले जातात.

 

Tags : belgaon, belgaon news, Karnataka Assembly Elections, highest constituency, belgaon district,