Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Belgaon › न्यायालयात घोषणा : कारवाईच्या हालचाली

न्यायालयात घोषणा : कारवाईच्या हालचाली

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 23 2017 12:14AM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

सोमवारी रात्रीच्या दंगलीनंतर मंगळवारी न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय आवारात काहींनी जोरदार घोषणाबाजी केली होती. याची पोलिस खात्याने गंभीर दखल घेतली आहे. प्रभारी पोलिस आयुक्त रामचंद्रराव यांनी या घटनेची माहिती माागविली आहे. 

दंगलीनंतर जमावाने मंगळवारी सकाळी न्यायालय आवारात जोरदार घोषणाबाजी केली.  अटक केलेल्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्यानंतर कारागृहाकडे नेण्यात येत असताना न्यायालय आवारात थांबलेल्या जमावाने घोषणाबाजी केली. अटक केलेल्यांच्या सुटकेसाठी आरडाओरड केली. वकील संघटनेने घोषणाबाजीची दखल घेतली होती. 

संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बेळगाव जिल्हा मुख्यसत्र न्यायाधीश आर. जे. सतीशसिंग यांची भेट घेऊन घोषणाबाजीसंदर्भात पोलिस अधिकार्‍यांना चौकशीचा आदेश द्यावा, घोषणाबाजी करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. न्या. सतीशसिंग यांनीही पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांच्याकडे घोषणाबाजीसंदर्भात चौकशीचे आश्‍वासन दिले होते. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी लाटकर यांची भेट घेऊन घोषणाबाजी करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. 

लाटकर यांनी घोषणाबाजी झालेल्या दिवसाचे चित्रीकरण आणि छायाचित्रे मागवून घेतली आहेत. त्यामुळे  घोषणाबाजी करणार्‍यांवर कारवाईची दाट शक्यता आहे. पोलिस प्रशासनाच्या हालचालीही सुरू झाल्याचे कळते. पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलेल्या भाजप आमदार व नेत्यांनी न्यायालय आवारात पाकिस्तानच्या बाजूने घोषणाबाजी करणार्‍यांवर का कारवाई केली नाही, असा जाब पोलिस उपायुक्त अमरनाथ रेड्डी यांना विचारला. आपण भारतात राहतो की पाकिस्तानात, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावरुन पोलिस प्रशासनाला सदर प्रकरणाची दखल घेणे भाग पडले.