Sat, May 25, 2019 22:57होमपेज › Belgaon › धार्मिक सलोखा राखणार्‍यांना हुसकावून लावण्याचा हेतू

धार्मिक सलोखा राखणार्‍यांना हुसकावून लावण्याचा हेतू

Published On: Dec 23 2017 2:03AM | Last Updated: Dec 22 2017 8:53PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

खडक गल्ली, भडकल गल्ली, दरबार गल्ली, खंजर गल्ली, चांदू गल्ली या भागामधील शातंताप्रिय सलोखा पाळणार्‍यांना हुसकावून लावण्याचाच समाजकंटकांचा डाव असल्याचे आणखी एक महत्वाचे कारण पुढे आले आहे. आपली पिढीजात घरेदारे सोडून अन्यत्र स्थलांतरित व्हावे व त्यांच्या मालमत्ता कमी भावामध्ये आपल्याला खरेदी करता याव्यात हे प्रमुख कारण देखील त्या भागात वरचेवर होणार्‍या जातीय दंगलीमागे असल्याचे पुढे येत आहे. 

हा भाग खूपच दाट लोकवस्तीचा, निमुळत्या रस्त्यांचा व भंगी रस्त्यांनी व्यापलेला आहे. त्याठिकाणी आपल्या त्या काळ्या धंद्यांना कोणाचा अडथळा राहू नये असेच त्या समाजकंटकांना वाटत आहे. त्यासाठीच त्याठिकाणी वर्षातून चार -पाच वेळा दंगल घडवून नागरिकांची घराबाहेर लावलेली वाहने बिनधास्तपणे जाळली जात आहेत. घरांना आगी लावण्याचे प्रकारही घडले आहेत.  

त्या भागातील शांतताप्रिय नागरिकांना सर्वात जास्त त्या दंगलींचा व पोलिसांचा फटका बसत आहे. त्यामुळे तेथील काही नागरिकांनी तेथील आपली घरेदारे सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. वरचेवर होणार्‍या दंगली, नासधूस व निष्पाप नागरिक, तरुणांवर पोलिस घालत असलेले गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्यामुळे तेथील नागरिकांना त्या वसाहतीत राहाणेच कठीण होऊन बसले आहे.

वरचेवर त्याठिकाणी दंगली घडत असल्याने तेथील नागरिकांच्या मुला-मुलींची विवाह जमणेसुद्धा कठीण होऊन बसले आहे. काही इमारत मालकांकडे भाड्याने रहात असलेल्या कुटुंबांनी तर तेथील दंगलींना घाबरून तेथील घरे सोडून अन्यत्र राहायला गेलेेले आहेत.