Mon, Mar 25, 2019 13:12होमपेज › Belgaon › 'स्‍मार्ट सिटी'चे काम तीन वर्षांत पूर्ण होणार?

'स्‍मार्ट सिटी'चे काम तीन वर्षांत पूर्ण होणार?

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 12:36AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यापासून आतापर्यंत दोन टप्यात 400 कोटींचा निधी विकासासाठी वितरित झाला आहे. मात्र सरकारी कार्यालयात 2021 पर्यंत स्मार्ट सिटीच्या बेळगावमध्ये काय काय असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसे फलकदेखील लावण्यात आले आहेत. मात्र कागदावर आराखडा बनविणे व तो प्रत्यक्षात अमलात आणणे मोठे आव्हान मनपासह सर्वच खात्यासमोर आहे.

तीन वर्षांत स्मार्ट सिटीअंतर्गत कामे पूर्ण होतील का?

बेळगावात 58 प्रभाग आहेत. सर्वच प्रभागात स्मार्ट सुविधा पुरवून बेळगाव शहर बंगळूरच्या पाठोपाठ स्मार्ट होणार आहे. त्यासाठी कामाला प्रारंभ झाला असून 2021 पर्यंत स्मार्ट सिटीअंतर्गत सर्व कामे पूर्ण होतील का, अशी शंका व्यक्त होत आहे. घरे, व्यवसाय, व्यापार, औद्योगिकरण राखीव खुल्या जागा, खेळाची मैदाने, रहदारीसाठी रस्ते, पाण्यासाठी मिळून 8 हजार 212.06 हेक्टर जागा वापरण्याचे उद्दिष्ट आहे. पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी 131.35 हेक्टर जमीनीचा वापर करण्यात येणार आहे. 800.19 हेक्टर जागेत मोकळी जागा, बाग, उद्याने, खेळाची मैदाने याचा सामावेश राहणार आहे. औद्योगिक विकासावर भर देण्यासाठी 839.75 एकर जमीन राखीव ठेवली आहे. घरासाठी 3795.85 हेक्टर जमीन म्हणजे 46.97 टक्के  जमीन राखीव राहणार आहे. जीपीएसनुसार बेळगावचा नव्याने सर्व्हे करणे गरजेचे आहे. बेळगावातील मोकळ्या जागा, भंगीबोळात अतिक्रमण झाले असून त्यावर टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत.

मध्यंतरी नकाशाप्रमाणे अतिक्रमण हटविण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निमूर्र्लन पथकाने अशा प्रकारच्या गिळकृंत केलेल्या जमिनी ताब्यात घेण्याचा सपाटा चालविला होता. त्यानंतर या मोहिमेत खंड पडला.