Fri, May 24, 2019 06:31होमपेज › Belgaon › स्मार्ट सिटी मिशनमध्ये वाहतूक, सुरक्षिततेवर भर

स्मार्ट सिटी मिशनमध्ये वाहतूक, सुरक्षिततेवर भर

Published On: Sep 02 2018 1:10AM | Last Updated: Sep 01 2018 10:55PMस्मार्ट  सिटीविषयी जिल्हाधिकारी एस. झियाउल्‍ला यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच अधिकार्‍यांची बैठक झाली. तातडीने योजनेतील कामे सुरू करण्याची सूचना त्यांनी दिली. महापालिका आयुक्‍त शशीधर कुरेर बंगळूरला स्मार्ट सिटीच्या बैठकीला जाऊन आले. शनिवारी त्यांनी बंद दाराआड महापालिकेत अधिकार्‍यांची बैठकही घेतली. लवकरच स्मार्ट सिटीची कामे सुरू होणार आहेत. मंजूर निधी किती आणि त्यातून कोणती कामे होणार, याचा आढावा आजपासून..

बेळगाव : प्रतिनिधी

येत्या आर्थिक वर्षात एकूण 3 हजार 866 कोटींची कामे हाती घेण्यात येणार आहेत. सध्या 68 प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येणरा आहे. यामध्ये स्मार्ट सिटी मिशन (एससीएम) अंतर्गत 1 हजार 8 कोटी रुपये, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत 1 हजार 6 कोटी, कॉर्न्व्हजन्स प्रोजेक्ट अंतर्गत 1 हजार 871 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 

त्यातील एससीएम फंडेड प्रोजेक्टमध्ये सर्वाधिक महत्त्व सुरळीत वाहतूक आणि सुरक्षिततेला देण्यात आले आहे. नो हॉकर्स, हॉकर्स झोन, बससाठी वेगळा रस्ता, बस टर्मिनल, बॅटरीवरील रिक्षा, सायकल ट्रॅक, संगणकीकृत रोड जंक्शन 229 कोटी रुपये, वीज खांबांवर लोंबकळणार्‍या उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करण्यासाठी 168 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

शिवाय इ-गव्हर्नन्स, महिलांच्या सुरक्षेसाठी जीपीआरएस, ट्राफिक सेन्सर्स आदींसाठी 129 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मनोरंजनासाठी हेरिटेज पार्क निर्माण करण्यात येणार आहेत. यामध्ये उद्यान, त्या शेजारी करमणुकीसाठी साधने, रोप लागवड करून वाढविणे, आर्ट गॅलरी, मुलांसाठी सायन्स पार्क, खासगी बससाठी पार्किंग, उद्यानांमध्ये पावसाचे पाणी जिरविण्याची व्यवस्था अशी कामे होणार आहेत. घन कचरा व्यवस्थापन, भूमिगत जलवाहिनी, सांडपाण्याच्या योग्य निचर्‍यासाठी नाल्यांची व्यवस्था यावर भर देण्यात आला आहे.