Fri, Jul 19, 2019 07:24होमपेज › Belgaon › गणेशभक्तांच्या सेवेत ‘माझा बाप्पा अ‍ॅप’

गणेशभक्तांच्या सेवेत ‘माझा बाप्पा अ‍ॅप’

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:10AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहरात भव्य दिव्य गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, इतर राज्यात किंवा परदेशात राहणार्‍या आपल्या नातेवाईक व मित्रांना याची अपडेटेड माहिती मिळत नाही.  यासाठी अभियंते श्रेयस पाटील यांनी ‘ारूरलरिरि’ (माझा बाप्पा)  मोबाईल अ‍ॅप लाँच केले आहे. यामध्ये मंडळाचा किंवा घरातील गणेशाचा फोटो अपलोड करता येतो. प्रत्येकाला याचा लाभ घेता येणार आहे. यामुळे बेळगावकर गणेशभक्तांच्या सेवेत मंगळवारी (दि. 11) माझा बाप्पा अ‍ॅप दाखल झाले आहे.

विजयनगर येथील अभियंते श्रेयस श्रीकांत पाटील यांनी हे अ‍ॅप बनविले आहे. बंगळूर येथे खासगी सॉफ्टवेअर कंपनीत ते सेवेत आहेत. बेळगावातील गणेशभक्तांना लाभ व्हावा यासाठी त्यांनी हे अ‍ॅप विकसित केले आहे. सणासाठी या स्वतंत्र अ‍ॅपचा वापर करता येणार आहे.

‘ारूरलरिरि’ (माझा बाप्पा) या अ‍ॅपमध्ये सर्व नोंदणीकृत गणेश मंडळे गणपतीचे फोटो व इतर कार्यक्रमांचे फोटो अपलोड करू शकतात. तसेच प्रत्येक घरातील गणपतीचे देखावे व इतर मूर्तींचे फोटो अपलोड करता येणार आहेत. यामुळे देशभरात हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास प्रत्येकाला बेळगावमधील गणेशाचे दर्शन होणार आहे. 

गणेश मंडळांनी हे अ‍ॅप वापरण्यासाठी मंडळाचा एक पदाधिकारी  किंवा कार्यकर्त्याचा मोबाईल क्रमांक, नाव व पत्ता देणे गरजेचे आहे. ही माहिती दिल्यानंतर मंडळाला एक युजर आयडी व पासवर्ड दिला जाणार आहे. त्याचा वापर करून मंडळे आपले देखावे, गणपतीचे फोटो आपल्या कार्यक्रमाचे फोटो व माहिती अ‍ॅपवर अपलोड करू शकणार आहेत. यासाठी लाईकचा ऑप्शनही देण्यात आला आहे.                                                                                                                                          
सर्वाधिक लाईक मिळालेल्या प्रथम तीन फोटोंना बक्षिसे देण्यात येणार आहेत. या अ‍ॅपमध्ये गणेशोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यावर आवडलेल्या तीन मंडळांना मतदान करता येणार आहे. विजेत्या मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. या अ‍ॅपमध्ये वैयक्तीक युजर 6 फोटो व मंडळे 21 ते 50 फोटो अपलोड करू शकणार आहेत. फक्त 21 दिवसांपुरता हा अ‍ॅप असणार आहे.