Wed, May 22, 2019 23:06होमपेज › Belgaon › मलप्रभाचे लक्ष्य आता ऑलिम्पिक

मलप्रभाचे लक्ष्य आता ऑलिम्पिक

Published On: Sep 03 2018 1:38AM | Last Updated: Sep 03 2018 12:01AMबेळगाव  : प्रतिनिधी

जकार्ता येथे एशियन स्पर्धेत करास अर्थात स्टॅडिंग ज्युडो प्रकारात भारताला कांस्यपदक मिळवून देणारी तुरमुरी (ता. बेळगाव) येथील कन्या मलप्रभा जाधवचे रविवारी बेळगावात जंगी स्वागत करण्यात आले.ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पदक मिळविण्याचे लक्ष्य असल्याचे तिने सांगितले. सकाळी मलप्रभा जाधवचे  बंगळूरहून बेळगावत आगमन झाले. येथील सर्कीट हाऊस येथे स्वागत करण्यात आले. या समारंभास महापौर बसाप्पा चिक्‍कलदिनी, आ. अनिल बेनके, आ. विवेक पाटील, पोलिस आयुक्त डी. सी. राजाप्पा, उपायुक्त सीमा लाटकर, जिल्हा पोलिस प्रमुख सुधीर कुमार रेड्डी, मनपा आयुक्त शशिधर कुरेर, बेळगाव जिल्हा युवजन क्रीडाधिकारी एल. बी. रंगय्या, अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर, प्रशिक्षक जितेंद्र सिंग, त्रिवेणी सिंग, मलप्रभाची आई शोभा जाधव, वडील यल्‍लापा जाधव उपस्थित होते.     

प्रशिक्षकांनी घेतलेली मेहनत व जकार्ता येथे सराव शिबिरात घेतलेल्या ट्रेनिंगचा फायदा झाला.तसेच आई-वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे यश मिळाल्याचे मलप्रभाने सांगितले. यावेळी क्रीडा अधिकारी, तुरमुरी ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

पोलिसांकडून दहा हजाराचे बक्षीस

आ. अनिल बेनके व आ. विवेक पाटील यांनी मलप्रभाचे स्वागत करून शासनाकडून आर्थिक मदत देणार असल्याचे सांगितले.  पोलिस आयुक्त राजाप्पा यांनी मलप्रभा जाधव हिला पोलिस खात्याच्या वतीने दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले.