Thu, Jan 17, 2019 04:57होमपेज › Belgaon › किर्लोस्कर रोड लॉजवर छापा

किर्लोस्कर रोड लॉजवर छापा

Published On: Sep 02 2018 1:10AM | Last Updated: Sep 01 2018 11:03PMबेळगाव: प्रतिनिधी

किर्लोस्कर रोड येथे एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून खडेबाजार पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा छापा टाकून दोघांना अटक केली. अडव्याप्पा दाम्माप्पा तिगडी (वय 38, रा. वक्कुंद, ता. बैलहोंगल), व लॉजचा व्यवस्थापक रमेश शंकर आसुंडी (वय 32, रा. बोगूर, ता. खानापूर) अशी अटक करण्यात     आलेल्यांची नावे आहेत. 

किर्लोस्कर रोड येथील चेतन लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरून ही कारवाई करण्यात आली. बैलहोंगल तालुक्यातील एका पीडित महिलेचा गैरफायदा घेऊन  तिला वेश्या व्यवसाय करत असल्याची बाब यावेळी निदर्शनास आली.  

लॉज मालक सोमशेखर नायक फारारी झाला आहे. पीडित महिलेला पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले आहे. याबाबत खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास चालविला आहे.