Tue, Mar 19, 2019 09:52होमपेज › Belgaon › विधान परिषद तीन जागांसाठी ३ ऑक्टोबरला निवडणूक

विधान परिषद तीन जागांसाठी ३ ऑक्टोबरला निवडणूक

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:16AMबेळगाव : प्रतिनिधी

विधान परिषदेतील तीन जागांसाठी 3 ऑक्टोबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे वेळापत्रक मंगळवारी (दि. 11) जाहीर केले.

डॉ. जी. परमेश्‍वर, के. एस. ईश्‍वरप्पा आणि व्ही. सोमण्णा यांनी विधानसभेची निवडणूक लढवून विजय मिळविला. त्यांनी विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर तीन पदे रिक्त झाली होती. परमेश्‍वर आणि ईश्‍वरप्पांचा कार्यकाळ 30 जून 2020 होता, तर व्ही. सोमण्णा यांचा कार्यकाळ 30 जुलै 2022 पर्यंत होता. 

14 सप्टेंबरला अधिकृत अधिसूचना लागू केली जाणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होईल. 22 पर्यंत दाखल करता येणार आहेत. 24 रोजी छाननी, 26 पर्यंत माघार, 3 ऑक्टोबरला मतदान आणि त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी व निकाल जाहीर होईल.