Sat, Jul 20, 2019 08:35होमपेज › Belgaon › राष्ट्रपतींच्या दौर्‍यामुळे वाहतूक मार्गात बदल

राष्ट्रपतींच्या दौर्‍यामुळे वाहतूक मार्गात बदल

Published On: Sep 13 2018 1:42AM | Last Updated: Sep 13 2018 12:05AMबेळगाव : प्रतिनिधी

येथील कर्नाटक लॉ सोसायटी आणि राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद सरन्यायाधीश, राज्यपाल वजुभाई वाला, मुख्यमंत्री कुमारस्वामी आदी दि. 15 रोजी उपस्थित राहणार आहेत.  त्यामुळे सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 पर्यंत महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

सांबरा विमानतळावरुन महनीय व्यक्तींचे आगमन होणार आहे. त्यामुळे सांबरा भुयारी मार्ग महांतेश नगर अशोक चौक येथून येणारी वाहने अलारवाड भुयारी मार्गब्रीज येडियुराप्पा रोड, जुना पीबी रोडमार्गे जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोव्याकडून येणारी परिवहन मंडळाच्या बसेस पिरनवाडी नाक्यावर थांबविण्यात येतील. 
कोल्हापूर गोकाक धारवाड या भागातून येणारी परिवहन मंडळाच्या बसेस अशोकनगर येथील चौथा मेन रस्त्यावर प्रवाशांना उतरवून तेथूनच पुढे सोडण्यात येतील. शहरातील वाहतूक व्यवस्था अशोकनगर येथून धर्मनाथ सर्कल मार्गे वळविण्यात आली आहे. 

दि. 14 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत आणि दि. 15 रोजी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.  गोवा, खानापूर या भागातून येणार्‍या वाहनांना देसूर येथून केके कोप्प हलगामार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोकाककडून येणार्‍या वाहनांना राष्ट्रीय महामार्ग 4 येथून केके कोप्पमार्गे देसूरहून गोव्याकडे जाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरहून येणारी वाहने शहरात न जाता राष्ट्रीय महामार्ग 4 येथील केकेकोप्प क्रॉस येथून देसूरमार्गे गोव्याला जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

पहिले रेल्वे गेट, दुसरा रेल्वे गेट वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी कपिलेश्‍वर ओव्हरब्रीज व पीबी रोडवरील ओव्हरब्रीजवरून ये-जा करावी. शहराच्या व्याप्तीत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर आणि सर्व्हीस रोडवर कोणत्याही प्रकारचे वाहन थांबविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. बॉक्साईट रोड व अलारवाड येथे वाहने थांबवावीत. 
राष्ट्रपतींचे आगमन सांबरा रस्त्यावरुन होणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यासह राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 लेकव्ह्यू हॉस्पिटल रस्ता, अशोक चौक ते चन्नम्मा चौक ते गोगटे सर्कल, काँग्रेस रोड, खानापूर रोड आणि चन्नम्मा चौक ते कोल्हापूर सर्कल पर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूनी वाहन थांबविण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

विजापूर बागलकोट नेसरगी यरगट्टी, लोकापूर, येथून येणार्‍या वाहनांना मारिहाळ पोलिस स्थानकाशेजारी असणार्‍या सुळेभावी रस्त्यावरुन गोकाक रस्त्याकडे जाण्याची सोय करण्यात आली आहे. सदर नियम रुग्णवाहिकेला लागू राहणार नाहीत.