Wed, Mar 27, 2019 04:19होमपेज › Belgaon › दिव्या शिवराम यांच्याकडून स्टॅाक कांगरी शिखर सर

दिव्या शिवराम यांच्याकडून स्टॅाक कांगरी शिखर सर

Published On: Sep 12 2018 1:47AM | Last Updated: Sep 12 2018 12:07AMबेळगाव : प्रतिनिधी 

जीवघेण्या थंडीच्या लाटा, उणे दहा इतके  तापमान, अतिशय प्रतिकूल परिस्थिती, निसर्गाचा लहरीपणा, कधी कोसळणार्‍या बर्फाची धास्ती तर कधी हिमवादळाचा तडाखा अशा प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत तब्बल 20 हजार फुटावरील उंचावरील शिखर पादाक्रांत करण्याचा पराक्रम कॅन्टोन्मेट बोर्डाच्या सीईओ दिव्या शिवराम दांपत्याने केला. 

बेळगाव कॅन्टोन्मेट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व त्यांचे पती श्रेयस होसूर यांनी ही कामगिरी पार पाडली. बेळगावसारख्या शहरात कन्टोन्मेट बोर्डामध्ये मुख्य कार्यकारी म्हणून काम पाहणार्‍या दिव्या शिवराम यांनी  हिमालयातील अत्यंत कठीण म्हणून ओळखणारे स्टॉक कांगरी 20, 180 फूट उंज शिखर पादाक्रांत केल्याने बेळगाव शहराची मान उंचावली आहे.

श्रेयस होसूर आणि दिव्या शिवरामन यांनी उणे 10 डिग्री तापमानात ही आपली मोहीम फत्ते केली आहे. तत्पूर्वी त्यांनी लेह येथून मोहिमेला सुरुवात केली. लेह हे ठिकाणी 11, 500 फूट  उंचीवर आहे. तत्पूर्वी सदर सहा महिने या नव दांपत्याने देशाला संदेेश देण्यासाठी योगा आणि प्राणायाम यांचा उपयोग केला. त्यामुळे त्यांना हे शिखर गाठताना कोणताही त्रास झाला नाही.

या उपक्रमामध्ये दिव्या शिवराम आणि त्यांचे पती श्रेयसह होसूर यांना स्थानिक जवान शेर्पा यांनी मार्गदर्शन केले. स्टोक कांगरी हे अवघड शिखर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या दांपत्याने हे आव्हान पेलले. यावेळी बर्‍याचवेळा त्यांना विविध ठिकाणी बर्फ वर्षावाला सामोरे जावे लागले.