Wed, Jul 24, 2019 14:22होमपेज › Belgaon › आज बेळगुंदीत साहित्याचा गजर

आज बेळगुंदीत साहित्याचा गजर

Published On: Dec 10 2017 1:18AM | Last Updated: Dec 09 2017 10:45PM

बुकमार्क करा

बेळगुंदी : प्रतिनिधी

रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमी, बेळगुंदी आयोजित 12 वे मराठी साहित्य संमेलन रविवारी होत आहे. अध्यक्षपदी नाटककार अभिराम भडकमकर राहणार आहेत. उद्घाटन आ. संजय पाटील यांच्या हस्ते होणार असून स्वागताध्यक्षपदी ज्योतीकुमार फगरे राहणार आहेत. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक अभिराम भडकमकर आपले विचार मांडतील.

दुसर्‍या सत्रात  प्रा. वैजनाथ महाजन यांचे ‘साहित्य संमेलने आणि मराठी माणूस’ व डॉ. अनिल मडके यांचे ‘प्रकृती, संस्कृती आणि विकृती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तिसर्‍या सत्रात कवी दयासागर बन्ने यांच्या अध्यक्षतेखाली ‘हुंदका कवितेचा’ नवोदित आणि निमंत्रित कविंचे संमेलन होणार आहे. शेवटच्या सत्रात जादूगर प्रेमानंद यांचा  ‘जादुचा प्रयोग’ रंगणार आहे.