होमपेज › Belgaon › निवडणुकीवरून दोन गटांत हाणामारी; सोसायटी सचिवासह तिघांना अटक

हंदिगनूरमध्ये राडा

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:20PMबेळगाव : प्रतिनिधी

हंदिगनूर कृषी पत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीत दोन गटांत राडा होऊन तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यात सोसायटीच्या सचिवाचाही समावेश आहे. दोन गटांतील वाद मिटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. मारुती केदारी पाटील (वय 42, रा. हंदिगनूर), महेश विष्णू पाटील (37, रा. हंदिगनूर), तुकाराम गोपाळ बेळगावकर (रा. हंदिगनूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. 

हंदिगनूर येथे रविवारी (दि. 29) प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाची निवडणूक झाली. हंदिगनूरसह सोसायटीमध्ये भागधारक असणार्‍या चलवेनट्टी, म्हाळेनहट्टी, कुरीहाळ, बोडकेनट्टी, बंबरगा, कट्टनभावी या गावांमधील मतदार जमले होते. हंदिगनूर प्राथमिक शाळेमध्ये मतदान झाले. रविवारी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वा. पर्यंत मतदान झाल्यानंतर नंतर मतमोजणीला प्रारंभ झाला. निकाल जाहीर होताच फटाके लावून जयघोष करण्यात आला. यावेळी एकमेकांच्या नेत्यांविरोधातही घोषणा देण्यात आल्या.  त्यावरून वाद चिघळला आणि दोन गटांत हाणामारी झाली. त्यामुळे बंदोबस्तासाठी असणार्‍या     
पोलिसांनी जमावला पांगविण्यासाठी लाठीमार केला, तर कांही जणांची धरपकड केली. अटक करण्यात आलेल्यामंध्ये तुकाराम हे सोसायटीचे सचिव आहेत. 

विधानसभेचे पदसाद... 

गेल्या विधानसभा निवडणुकीश्री स्पर्धेचे पडसाद आता उमटत आहेत. असाच प्रकार हंदिगनूर येथे घडल्याची चर्चा आहे.

कारवाई एकाच गटावर?

काकती पोलिसांकडून केवळ एकाच गटाच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. दुसर्‍या गटाच्या कार्यकर्त्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. पोलिस यंत्रणा राजकीय दबावाला बळी पडून काम करत असल्याचा आरोप ग्रामस्थांतून करण्यात येत आहे. काकती पोलिस उपनिरीक्षक हंचीनमनी, सहनिरीक्षक रमेश हुगार यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे. अटक करण्यात आलेल्यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.