Sun, Jul 21, 2019 07:55होमपेज › Belgaon › बसवेश्‍वरांचे विचार आचरणात आणा

बसवेश्‍वरांचे विचार आचरणात आणा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कारदगा : वार्ताहर

बाराव्या शतकात बसवेश्‍वरांनी पहिली समानता समाजात निर्माण केली. प्रत्येक मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. वचन साहित्यातून प्रत्येक मानवाचा उद्धार कसा होतो, हे सांगितले. मनुष्याचे बाह्य व अंतर्मन शुद्धीसाठी वचन साहित्य आजच्या काळात प्रभावी आहे, असे प्रतिपादन प.पू.संपादना महास्वामींनी केले.

ढोणेवाडी येथील बसवेश्‍वर युवक संघ व ग्रामस्थांच्या देणगीतून साकारलेल्या जगदगुरु बसवेश्‍वर महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण आमदार शशिकला जोल्ले, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प.पू. संपादन महास्वामी बोलत होते.

आ. शशिकला जोल्ले यांनी पूजा केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.  बसवेश्‍वर महाराजांच्या पुतळ्यास अण्णासाहेब जोल्ले, शशिकला जोल्ले, एस. एस. माळी यांनी पुष्पहार अर्पण केला. 

आ.जोल्ले म्हणाल्या, आठशे वर्षांपूर्वी बसवेश्‍वरांनी स्त्री-पुरुष समानतेसह जाती निर्मूलनाचे काम केले. अनुभव मंटपद्वारे लहानमोठ्यांसह स्त्रियांनाही विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ते महान समाजसुधारक होते. 

अण्णासाहेब जोल्ले म्हणाले, चिकोडीनंतर ग्रामीण भागातील बसवेश्‍वरांचा हा एकमेव पुतळा असून या मंडळाचे कार्य प्रेरणादायी आहे. समाजसुधारकांंचे आचार,विचार सर्व समाजापर्यंत पोहचविण्याची आज नितांत गरज आहे.

स्वागत दीपक माळी, प्रास्ताविक अशोक पाटील तर सूत्रसंचालन गुरुनाथ सदलगे व मलगोंडा घाटगे यांनी केले. कार्यक्रमास हालशुगर संचालक रामगोंडा पाटील, जि.पं.सदस्या सुमित्रा उगळे, ग्रा.पं. अध्यक्षा संपदा जाधव, उपाध्यक्षा शेहनाजबी जमादार, ता.पं.सदस्य दादासो नरगट्टे, एपीएमसी सदस्य नितेश खोत, अरविंद खराडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
 


  •