Thu, Jun 27, 2019 01:40होमपेज › Belgaon › महासोहळा....महामस्तकाभिषेक

महासोहळा....महामस्तकाभिषेक

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 10:38PMजैन धर्मियांच्या तीर्थंकरांपैकी एक असलेल्या भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक कार्यक्रमासाठी श्रवणबेळगोळचे इंद्रगिरी बेट सज्ज झाले आहे. येथे देशभरातील जैनमुनींचे आगमन झाले असून बुधवार 7 पासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

 बाहुबली हे जैन धर्मियांचे पहिले तीर्थंकर आदिनाथ यांचे पुत्र. बंधू भरत चक्रवर्ती यांच्याशी झालेल्या तुंबळ युद्धानंतर बाहुबलींनी राजसंन्यास घेऊन मोक्षप्राप्तीसाठी मार्ग धरला.तब्बल 12 महिने कठोर तपस्या करून पुण्य संपादन केलेले बाहुबली हे जैन धर्मियांचे आराध्य दैवत मानले जाते. या आराध्य दैवताला 12 वर्षांतून एकदा महामस्तकाभिषेक करण्याची पद्धत हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली ती पुढे चालतच राहिली.

 12 वर्षांतूनच का?

 बंधू भरत चक्रवर्ती याच्याबरोबर झालेल्या घनघोर युद्धात रक्‍तपात व मृत्यू या सारख्यांमुळे उद्विग्न बनलेल्या  बाहुबली यांनी सर्वस्वाचा त्याग करण्याचा निश्‍चय केला. मोक्ष मिळविण्यासाठी 12 महिन्यांची कठोर तपस्या केली. चामुंडेरायाच्या श्रवणबेळगोळ येथे बाहुबली यांची एकाच शिळेमध्ये मूर्ती बनविण्यासाठी 12  वर्षांचा काळ लागला होता. त्यामुळे 12 वर्षांतून भगवान बाहुबलींना महामस्तकाभिषेक करण्याची प्रथा सुरू झाली ती हजारो वर्षांपासून आजही  आहे. 

सोहळा असा 

महामस्तकाभिषेक मुख्य सोहळ्याचा अगोदर 18 दिवस श्रवणबेळगोळ इंद्रागिरी बेटावर कार्यक्रमांना सुरूवात होते. यंदा 26 रोजी सोहळ्याचा अखेरचा दिवस असणार आहे.  7 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महामस्तकाभिषेक सोहळ्याचे उद्घाटन होईल. 

दिगंबर जैन पंथातील 500 स्वामींच्या उपस्थितीत दि.17 रोजी 107 कलशांनी भगवान बाहुबली मूर्तीवर अभिषेक होणार आहे. त्यानंतर  18 ते 25 फेब्रुवारीपर्यंत 8 दिवस 1008 कलशांनी मूर्तीवर अभिषेक होईल. जलाभिषेक, शहाळ्याचे पाणी, उसाचा रस, श्‍वेत कल्पचूर्ण, हळदीचे पाणी, जडीबुटीपासून तयार करण्यात आलेला द्रवपदार्थ, अष्टगंध, चंदन, तांदूळ पीठाचा द्रवपदार्थ, केशर, पुष्प आदी 21 पदार्थांनी मूर्तीवर अभिषेक होईल.

महास्तकाभिषेक सोहळ्याला हजारो वषार्र्ंचा इतिहास आहे. भगवान बाहुबलींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर प्रत्येक 12 वर्षांनी महामस्तकाभिषेक करण्याचा प्रघात सुरू झाल्याची माहिती इतिहासातून उपलब्ध होते. अर्थात ख्रिस्तपूर्व 981  सालात मूर्ती तयार झाली. मूर्तीचे शिल्पकार कोण याचा संदर्भ अद्याप उपलब्ध नाही.  

पहिला मस्तकाभिषेक कधी?

ख्रिस्तपूर्व 1398 मध्ये पहिला महामहास्तकाभिषेक झाला होता, असे शासन दरबारी उल्लेख आहे. त्यानंतर पुढेही हा सोहळा प्रत्येक वर्षांनी निरंतरपणे होत राहिला. 2000 सालात यापूर्वी 2006 मध्ये महामस्तकाभिषेक झाला होता.

या संदर्भात झालेल्या बैठकीत प्रामुख्याने  जैन समाजाचे पुष्पक हणमण्णवर, दक्षिण भारत जैन सभेच्या वतीने कीर्ती कागवाड, माणिकबाग दिगंबर जैन बोर्डिंगच्या वतीने अ‍ॅड. संजय कचनुरे, अण्णासाहेब उप्पीन, बाहुबली सावंत, राजू कटगेण्णवर, सुनील हणमण्णवर, आमदार संजय पाटील, माजी आमदार अभय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. चिक्‍कबस्ती ट्रस्ट कमिटी मठ गल्‍ली, धारिणी महिला मंडळ रामतीर्थनगर, महांतेशनगर, चन्नम्मानगर भागातील जैन बांधव व महिलांची उपस्थिती होती. कागवाड येथील शिरगुप्पी शुगर व इकोकेन शुगर (म्हाळुंगे) वतीने 10 टन साखर एक ट्रकने रवाना करण्यात आली.