Fri, Apr 26, 2019 20:15होमपेज › Belgaon › बागलकोट जिल्ह्यात भाजपला पाच तर काँग्रेसला 2 जागा

बागलकोट जिल्ह्यात भाजपला पाच तर काँग्रेसला 2 जागा

Published On: May 16 2018 1:39AM | Last Updated: May 16 2018 12:17AMजमखंडी : वार्ताहर

बागलकोट जिल्ह्यात सात विधानसभा मतदार संघापैकी पाच जागा भाजपला तर दोन जागा काँग्रेसला मिळाल्या. 

जिल्ह्यात बदामी विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी भाजप उमेदवार बी. श्रीरामूलू यांचा 1696 मतांनी पराभव केला. जमखंडी मतदारसंघात काँग्रेसचे आ. सिद्दू न्यामगौड यांनी भाजप उमेदवार श्रीकांत कुलकर्णी यांचा 2795 मतांनी पराभव केला. मुधोळ मतदार संघात भाजपचे गोविंद कार्जोळ सलग चौथ्यांदा विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे सतीश बंडिवड्डर यांचा 15,482 मतांनी पराभव केला तर बागलकोट येथे भाजपचे वीरण्णा चिरंतीमठ यांनी काँग्रेसचे एच. वाय. मेटी यांचा 15,934 मतांनी पराभव केला. तेरदाळ मतदारसंघात भाजपचे सिद्दू सवदी यांनी काँग्रेस उमेदवार उमाश्री यांचा 20611 मतांनी पराभव केला. बिळगी मतदार संघात भाजपचे मुरगेश निराणी यांनी काँग्रेसचे जे. टी. पाटील यांचा 4,811 मतांनी पराभव केला. हुनगुंद मतदार संघात भाजपचे दोड्डनगौडा पाटील यांनी काँग्रेसचे विजयानंद काश्यप्पनवर यांचा 5227 मतांनी पराभव करून या पाच जागा काँग्रेसकडून हिरावून घेतल्या.

बागलकोट बागायत विश्‍व विद्यालयाच्या विज्ञान महाविद्यालयात सात  मतदारसंघाची मतमोजणी झाली. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.