Wed, Jul 17, 2019 18:37होमपेज › Belgaon › निपाणीत कारमधील बॅग लंपास

निपाणीत कारमधील बॅग लंपास

Published On: Jan 21 2018 2:44AM | Last Updated: Jan 20 2018 11:52PMनिपाणी : प्रतिनिधी

कागल पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकार्‍याची बॅग अज्ञातांनी हातोहात लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास निपाणी पालिकेसमोर घडली. या बॅगेमध्ये 41 हजार रु., कागदपत्रे, चेक बुक, ए.टी.एम. कार्डे, एलआयसीचे 8 ते 10 बाँड होते. महिन्यात सलग तिसर्‍यांदा असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मूळचे खडकलाट येथील कागल पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. गावडे  सध्य क. सांगाव (ता.कागल) येथे राहावयास आहेत. शनिवारी ते कागल तालुक्यातील शाळा तपासणी कामासाठी निपाणीमार्गे जात होते. यावेळी करड्याळ शाळेचे शिक्षक सुरेश खोत यांच्या कारमधून कागदपत्रांची झेरॉक्स घेण्यासाठी पालिकेसमोरील एका झेरॉक्स सेंटरवर सकाळी 9.45 च्या सुमारास  आले.  यावेळी कार पंक्‍चर झाल्याचे लक्षात येताच खोत पालिकेसमोर असलेल्या पंक्‍चर सेंटरवर कार घेऊन गेले. ते चालकाकडील बाजूचा दरवाजा उघडून बोलत होते. दरम्यान, काम आटोपून गावडेही कारजवळ आले. यावेळी मागील सीटवर ठेवलेली बॅग नसल्याचे गावडे यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध केली मात्र बॅग सापडली नाही. 

त्यामुळे शहर पोलिसांत तक्रार दिली. हवालदार संतोषकुमार हिरेमठ यांनी पालिकेने लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दोन युवक कारमधील बॅग घेऊन बसस्थानकाकडे चालत गेल्याचे दिसून आले. या फुटेजवरून पोलिस पुढील तपास करत आहेत.