Fri, Jul 19, 2019 07:12होमपेज › Belgaon › मराठा इन्फंट्रीमुळे बेळगाव कँटोन्मेंटला ‘शान’

मराठा इन्फंट्रीमुळे बेळगाव कँटोन्मेंटला ‘शान’

Published On: Jul 23 2018 1:07AM | Last Updated: Jul 23 2018 12:18AMबेळगाव : परशराम पालकर

देशातील सारे कँटोन्मेंट बोर्ड रद्द करून तो परिसर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर आहे. निर्णय काही काळात अपेक्षित आहे. या पार्श्‍वभूमीवर कँटोन्मेंट बोर्ड का स्थापन केले गेले, त्यांचे वेगळेपण काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

भारतात इंग्रजांची सत्ता असताना 63 शहरांत कँटोन्मेंटची स्थापना केली गेली. ही सारी शहरे मोक्याच्या ठिकाणी वसलेली आहेत. कँटोन्मेंट परिसरात इंग्रज सैन्य तळ ठोकून असे आणि आजुबाजूच्या परिसराव ते नजर ठेवून असे. बेळगाव कँटोन्मेंट तर मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर अर्थात एमएलआयआरसीचे मुख्यालय  आहे. त्यामुळे ते बेळगावची शान आहे आणि पर्यायाने बेळगावकराच्या जीवनात जिव्हाळ्याचे स्थान असलेले आस्थापन आहे. 

भारत स्वतंत्र झाल्यानंतर इंग्रज भारतामधून निघून गेले. मात्र त्यांनी स्थापन केलेले कँटोन्मेंट बोर्ड तसेच राहिले. या बोर्डांवर वर्षाकाठी 476 कोटी खर्च होत आहेत. त्यामुळेच कँटोन्मेंट बरखास्त करुन त्यांचा समावेश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करावा असा प्रस्ताव केंद्र सरकारसमोर आहे. 

कॅन्टोन्मेंट म्हणजे काय?

कॅन्टोन्मेंट बोर्डांची स्थापन इंग्रजांनी 250 वर्षांपूर्वी  केली. सुरुवातीला इस्ट इंडिया कंपनी स्थापन केल्यानंतर कंपनीच्या सुरक्षेसाठी म्हणून आणि नंतर  आजूबाजूच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी कँटोन्मेंट बोर्ड स्थापन झाले. देशात बराकपूरमध्ये पहिला कँटोन्मेंट बोर्ड स्थापला गेला. देशात सरंक्षण मंत्रालयाकडे सुमारे 17  लाख एकर जमीन  असून त्यापैकी कँटोन्मेंट बोर्डांकडे 2 लाख एकर जमीन आहे.

बेळगावची का निवड?

बेळगावात 1818 मध्ये पेशवाईचे राज्य होते. 1832 मध्ये इंग्रजानी बेळगावाचा अभ्यास करुन या ठिकाणी कँटोन्मेंटची स्थापना केली. कारण या काळात कोल्हापूर संस्थान, म्हैसूर संस्थान, हैद्राबाद संस्थान, गोव्यात पोर्तुगालचे राज्य यांच्यावर बारीक नजर ठेवता यावी हा मुख्य उद्देश इंग्रजांचा होता.   

मालकी सरंक्षण खात्याकडे

कँटोन्मेंटमधील सार्‍या मालमत्ता लष्कराच्या मालकीच्या आहेत.  त्या ठिकाणी बहुमजली इमारती उभारता येत नाहीत.  शिमल्यात कँटोन्मेंट बोर्डांचे मुख्य कार्यालय असून तेथून सूत्रे हलतात.