Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Belgaon › जावयावर सासर्‍याचा चाकूहल्‍ला

जावयावर सासर्‍याचा चाकूहल्‍ला

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 20 2018 12:51AMबेळगाव : प्रतिनिधी

घटस्फोटाच्या खटल्यात न्यायालयात हजर होण्यासाठी आलेल्या जावयावर गुरुवारी सासर्‍याने चाकूहल्ला केला. न्यायालय आवारात गुरुवारी हा प्रकार घडला. जावई गंभीर जखमी आहे.

शिर्शी येथील निखिल सुरेश ढवळे (वय 23) हा पत्नीपासून घटस्फोट घेण्यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये आला होता. त्याचा सासरा राजन मनोहर काकडे (रा. गणपत गल्ली, बेळगाव) याने त्याच्याशी भांडण उकरून काढले. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत झाल्यानंतर सासर्‍याने जावई निखिलवर चाकूने वार केला.

त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून, त्याला जिल्हा इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी निखिलने मार्केट पोलिस स्थानकात सासरा राजनविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. घटनेमुळे न्यायालय आवारातील नागरिक व वकिलांमध्ये एकच खळबळ माजली.