Tue, Sep 25, 2018 04:39होमपेज › Belgaon › बेळगाव रेशनचा ३० टन तांदुळ जप्त 

बेळगाव रेशनचा ३० टन तांदुळ जप्त 

Published On: Jan 23 2018 10:40AM | Last Updated: Jan 23 2018 10:52AMनिपाणी : प्रतिनिधी

राज्यशासनाच्यावतीने जनतेसाठी रेशनवर पुरवठा होणाऱ्या अन्नभाग्य योजनेतील सुमारे ३० टन तांदुळाचा बस्‍तवाड(ता. कुकेरी) येथीलसाठा जप्त केला आहे. बेळगाव येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. यात एक ट्रक, एक टेम्पो असा एकूण तीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

बस्‍तवाड येथे एका खासगी गोडावूनमध्ये तांदळचा बेकायदेशीर साठा करून त्याची विेक्री केली जात होती. अशी माहिती डीसीबी विभागाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करून गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. यावेळी पथकाने तीस लाखाच्या मुद्देमालासह चार आरोपींना ताब्यात घेतले. जिल्ह्यात आत्तापर्यंत अशी कारवाई चार वेळा करण्यात आली आहे.