Thu, Jul 18, 2019 08:10होमपेज › Belgaon › क्रूझरमध्ये होते 24 जण

क्रूझरमध्ये होते 24 जण

Published On: Feb 20 2018 1:21AM | Last Updated: Feb 19 2018 11:00PMअथणी :वार्ताहर 

अथणीजवळ कोट्टलगी मार्गावर अडहळ्ळी लगत बस आणि क्रूझर यांच्यात शनिवार दि. 18 रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार आणि 16 जण जखमी झाले होते. या वाहनात एकूण 24 प्रवासी होते. अशी माहिती उपलब्ध झाली आहे.  अपघातस्थळी जिल्हा पोलिस प्रमुख सुधीर कुमार रेड्डी यांनी भेट देऊन पाहणी केली. जखमींना अथणी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ऐगळी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. 

सोमवारी पाहणी करताना जिल्हा पोलिस प्रमुख सुधीर कुमार रेड्डी यांच्यासमवेत डीवायएसपी रामनगोंडा बसगी, सीपीआय एच. शेखरेप्पा, एस. डी. कुंभार तसेच अथणी आणि ऐगळी पोलिस कर्मचारीही उपस्थित होते.  वाहने बेदरकारपणे आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे असे अपघात होत असतात, असे अपघात टाळण्यासाठी पोलिस खाते आणि नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.