होमपेज › Belgaon › मजगावात बंडखोरांना घेराव

मजगावात बंडखोरांना घेराव

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: May 01 2018 1:05AMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव दक्षिण मतदारसंघात बेकी करणार्‍या बंडखोर उमेदवाराला शहापूर येथे मराठी भाषिक मतदारांनी रविवारी जाब विचारण्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी मजगाव येथील म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरांना घेराव घालून जाब विचारला.

किरण सायनाक यांची मजगाव येथे प्रचारफेरी आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी गावात प्रवेश केल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी एकीबाबत कार्यकर्त्यांना प्रश्‍न विचारला. मराठी हितासाठी एकी आवश्यक असताना समितीत दुही माजवून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जोपर्यंत एकी होत नाही तोपर्यंत गावात प्रवेश करू नका, अशी भूमिका त्यांनी घेतली. यावरून प्रचारफेरीत सहभागी झालेल्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मतदारांच्या भूमिकेचे सीमाभागातून स्वागत करण्यात येत आहे. हा व्हिडीओ व्हाटस् अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून सीमाभागात सर्वत्र पसरला. ग्रामस्थांनी घेतलेला निर्णय गल्लीतील सूचना फलकावर लिहिण्यात आला आहे. सायनाक यांना सलग दुसर्‍या दिवशी मतदारांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे मराठी माणसात धूमसत असणारा असंतोष दिसून येत आहे.