Wed, Jul 17, 2019 08:24होमपेज › Belgaon › निवडणुकीपूर्वीच स्थायीच्या चारही अध्यक्षांची घोषणा..!

निवडणुकीपूर्वीच स्थायीच्या चारही अध्यक्षांची घोषणा..!

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:48PMबेळगाव : प्रतिनिधी

मनपातील सत्ताधारी मराठी गटाने चारही स्थायी समित्यांच्या अध्यक्षांची निवड  निवडणूक प्रक्रिया होण्यापूर्वी जाहीर केली आहेत. निवड समितीचे सभासद विनायक गुंजंटकर यांनी ही माहिती दिली. आरोग्य स्थायी समितीच्या अध्यक्षा म्हणून सुधा भातकांडे, शहर रचना व बांधकाम स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून मोहन भांदुर्गे, कर व अर्थ स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून पुंडलीक परिट व लेखा स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून राकेश पलंगे यांची निवड करण्यात आल्याचे गुंजटकर यांनी सांगितले. 

स्थायी समिती अध्यक्षांची निवडणूक 5 जुलैरोजी होणार आहे. त्यादिवशी कोणताही गोंधळ होऊ नये व मराठी गटाची सत्ता अबाधित राहावी या  उद्देशाने ही निवड  निवडणुकीपूर्वीच केल्याचे सांगण्यात आले. 

मराठी गटनेते संजय शिंदे, माजी उपमहापौर नागेश मंडोळकर, माजी महापौर किरण सायनाक व उपमहापौर मधुश्री पुजारी यांच्याशी चर्चा करूनच यापूर्वी एकदाही अध्यक्षपद मिळाले नसलेल्यांना संधी दिल्याचे गुंजटकर यांनी सांगितले. गुरुवारी विरोधी सदस्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरले तरी मराठीचे बहुमत असल्याने मराठी नगरसेवकांची अध्यक्षपदांवर निवड निश्चित आहे.