Sat, Jul 20, 2019 23:58होमपेज › Belgaon › ‘अनिल भाग्य’च्या लाभासाठी लाटला जातोय मलिदा!

‘अनिल भाग्य’च्या लाभासाठी लाटला जातोय मलिदा!

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 10:58PMबेळगाव ः प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुका दृष्टिक्षेपात ठेवून राज्य सरकारने योजनांची खैरात केली आहे. सरकारने प्रारंभ केलेल्या ‘अनिल भाग्य’ योजनेचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी 500 ते 1000 रुपये उकळण्यात येत असल्याचा प्रकार तालुक्यातील अनेक गावांमध्ये उघडकीस आला आहे.  गावागावातील ग्राम पंचायत सदस्यांकडून यासाठी मलिदा लाटण्यात येत आहे. ग्रा.पं सदस्यांच्या  कारभाराची जाहीर चर्चा होत नसली तरी दबक्या आवाजात आहे.  राज्य सरकारने केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेला शह देण्यासाठी मुख्यमंत्री अनिल भाग्य योजना सुरू केली. या माध्यमातून गॅस शेगडी, दोन सिलिंडर टाक्या देण्यात येत आहेत.

ज्या नागरिकाचे बीपीएल रेशनकार्ड आहे, अशांना याचा लाभ करून देण्यात येत आहे. टप्प्या टप्प्याने लाभार्थ्यांची निवड करून योजनेेचा लाभ करून देण्यात येणार आहे. प्रत्येक बीपीएल कार्डधारकाला   अनिल भाग्य योजनेतून याचा लाभ होणार आहे. मात्र पहिल्या टप्प्यामध्ये अनेक गावांमधील ग्राम पंचायत सदस्यांनी मर्जीतील व समर्थक असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच याचा लाभ करून देण्यात आला आहे. यामुळे ज्यांना याचा लाभ मिळालेला नाही अशांकडून चौकशी करण्यात येत असली तरी योजनेची माहिती समर्पकपणे देण्यात येत नाही. अशा परिस्थितीचा लाभ ग्राम पंचायत सदस्यांकडून उचलला जात आहे.

बीपीएल कार्डधारकाकडून 500 रु उकळण्यात येत आहेत. योजना मोफत असली तरी सदस्यांकडून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत आहे. अधिकार्‍यांना सांगून योजनेचा लाभ करून देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काही जणांनी गॅस जोडणी करणार्‍यांना काही तरी दिले पाहिजे असे सांगून 500 रु. उकळण्यात येत आहेत. निवडणुकीत आपल्या पक्षाच्या आमदारालाच मतदान करावे, मतदानाचा टक्‍का वाढवून पत वाढवून घेण्याच्या उद्देशाने मर्जीतील व पक्षाच्या समर्थकांनाच योजनेचा लाभ देण्याचा खटाटोप ग्राम पंचायत सदस्यांनी चालविला आहे. श्रेय लाटण्यासाठी कसतर केली जात आहे. 
पहिल्या टप्प्यात ज्यांना याचा लाभ करून देण्यात आलेला नाही, अशांच्या घरी जाऊ योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे. यासाठी अगावू रक्‍कम घेण्यात येत आहे. ग्रामीण भागात ग्रमा पंचायत सदस्यांनी जनतेची लूट चालविली आहे. याचा जाब विचारण्यासाठी कोणीच पुढे होताना दिसत नाही.