होमपेज › Belgaon › अमृत फार्माचे शैलेश जोशी यांची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

अमृत फार्माचे शैलेश जोशी यांची आत्महत्या

Published On: Jun 04 2018 9:37AM | Last Updated: Jun 04 2018 11:14AMबेळगाव : प्रतिनिधी 

उद्योजक शैलेश शरद जोशी (वय 40) यांनी स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली. स्वतः व्यसनमुक्त होऊन इतरांना व्यसनमुक्तीचा धडा देणाऱ्या या तरुण उद्योजकाने अचानक आपले जीवन संपविले यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.  आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही.   

मध्यरात्री दीड वाजता पाईपलाईन रोड गणेशपुर येथील घरी स्वतःच्याच रिव्हॉल्व्हर मधून गोळी झाडून घेऊन शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली. बेळगावचे माजी नगराध्यक्ष शरद जोशी यांचे ते चिरंजीव होते. प्रसिध्द अमृत मलम, अमृत फार्मा आदी कंपनीचे ते मालक होते.

मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान पिस्तूलाने हृदयावर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती कॅम्प पोलिस निरीक्षकानी दिली. मध्यरात्री गोळीचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी कॅम्प पोलिसांना कळवले. पोलिसांनी पाहणी करता ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले. आज सोमवारी पहाटे पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टेमसाठी आणण्यात आला आहे.
 

Tags : belaon, belgaon news, amrut farma owner, shailesh joshi, suicide, belgaon former nagradhyaksha shard joshi