Mon, May 27, 2019 08:41होमपेज › Belgaon › अमित शहा साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

अमित शहा साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दि. 2 एप्रिलपासून जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. ते बेळगावात विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, तर गोकाकमध्ये रोड शो आणि कित्तूरमध्ये मेळावा घेतील.

खासदार सुरेश अंगडी  यांनी कन्नड साहित्य भवन येथे या पत्रकार परिषदेत ही दिली. तत्पूर्वी आमदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करुन राज्य संघटना सचिव अरुण कुमार यांनी सदर दौरा यशस्वी करण्याचे आवाहन केले. 

शहा दि. 1 रोजी विशेष विमानाने सांबरा विमानतळावर रात्री 10 वा पोचतील. केएलई संस्थेच्या विश्रामगृहात ते वास्तव्य करणार आहेत. 2 रोजी जिल्ह्यातील नेत्यांबरोंबर अल्पोपहार घेउन सकाळी 9 वा हेलिकॉप्टरव्दारे कित्तूरला रवाना होतील. कित्तुर चन्नम्मा यांंच्या पुतळ्याचे पूजन करून, बैठकीनंतर ते ते नंदगड येथील संगोळी रायन्ना समाधीस्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहात विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम सकाळी 11.25 वा ते. 12. 30 वा. पर्यंत चालणार आहे. 12.45 वा पत्रकार परिषद होईल.

1.30 वा. ते भाजप नेत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर 2.वा निपाणीला रवाना हाणार आहेत.  3.40 वा निपाणीत महिलांच्या संवाद सभेद भाग घेऊन चर्चा करणार आहेत. सायंकाळी 4.30 वा. गोकाक येथे आगमन हाणार आहे. ते गोकाक येथे रोड शो करणार आहेत. ते सायंकाळी पुुन्हा बेळगावला येउन सायंकाळी 6.10 ते 7.10 या वेळेत जैन समाजाच्या नेत्यांच्या सभेत भाग घेणार आहेत. सायंकाळी 7.15 ते 8 वा.पर्यंत प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. 

दि. 3 रोजी हेलिकॉप्टर व्दारे बागलकोटला रवाना होतील. मंगळवारच्या बैठकीला खा, प्रभाकर कोरे, आम.लक्ष्मण सवदी, डॉ.विश्‍वनाथ पाटील, संजय पाटील, पी.राजीव, महांतेश कवटगीमठ, माजी मंत्री शशिकांत नाइक, इरणा कडाडी, भाजप महानगर अध्यक्ष राजेंद्र हरकुणी, यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


  •