Mon, Mar 25, 2019 17:24होमपेज › Belgaon › नंजिनकोडलच्या समस्या यात्रेपूर्वी सोडवा

नंजिनकोडलच्या समस्या यात्रेपूर्वी सोडवा

Published On: Mar 08 2018 12:00AM | Last Updated: Mar 07 2018 9:22PMखानापूर : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील नंजिनकोडलची लक्ष्मीदेवीची यात्रा तब्बल 26 वर्षानंतर 4 ते 11 एप्रिलदरम्यान होणार आहे. तत्पूर्वी गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मंदिर परिसराचा विकास आणि मुख्य रस्त्यांच्या विकासाचे काम मार्गी लावण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

लक्ष्मीदेवीच्या यात्रेनिमित्त गावात हजारो भाविकांची ये-जा होणार आहे. त्यामानाने गावातील मूलभूत विकासकामांची पूर्तता करणे गरजेचे आहे. क. नंदगड-सागरे रस्त्यावरून नंजिनकोडल अर्धा कि. मी. आत वसले आहे. या संपर्क रस्त्याची  दुर्दशा झाली आहे. त्याची दुरुस्ती अथबा डांबरीकरण होणे आवश्यक आहे. त्याशिवाय बिडीमार्गे नंजिनकोडलला जोडणार्‍या दीड कि. मी. रस्त्याचीही अशीच अवस्था झाली आहे. यापैकी अर्धा कि. मी. रस्त्याचा विकास करण्यात आला आहे. उर्वरित एक कि. मी. चे डांबरीकरण करण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

गावातील लक्ष्मी मंदिराच्या सभोवती पेव्हर्सब्लॉक घालण्याचे कामही रेंगाळले आहे. अंतर्गत रस्त्यांचेही सिमेंटीकरण करण्यासाठी ग्रा. पं ने युद्धपातळीवर प्रयत्न हाती घेण्याची गरज आहे.गावातील शेतकरी सभासदांचा हलशी प्राथमिक कृषीपत्तीन संघामध्ये समावेश होतो. येथून घेतलेल्या कर्जाची शेतकर्‍यांनी भरणा केली आहे. नव्या कर्जवाटपाचे काम पुढील महिन्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. यात्रेकरिता नागरिकांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासणार असल्याने या महिन्याच्या 20 तारखेपर्यंत शेतकर्‍यांना कर्जपुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.