Tue, Jan 22, 2019 20:29होमपेज › Belgaon › यशासाठी सकारात्मक विचार आवश्यक

यशासाठी सकारात्मक विचार आवश्यक

Published On: Feb 18 2018 1:57AM | Last Updated: Feb 18 2018 1:57AMबेळगाव : प्रतिनिधी

आयुष्यात वाटचाल करताना नेहमी सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. समाजहितासाठी केलेल्या कामाची पोचपावती नक्की मिळते. नियती फाउंडेशनने चालविलेले कार्य महिलांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी केले. 

नियती फाउंडेशन आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेची अंतिम फेरी बी. के. मॉडेलच्या मैदानावर पार पडली. यावेळी कुलकर्णी बोलत होत्या.
 व्यासपीठावर पद्मश्री सीतव्वा जोडट्टी, पोलिस उपायुक्त सीमा लाटकर, कॅन्टोमेंट अधिकारी दिव्या शिवराम, महापौर संज्योत बांदेकर, डॉ. निता देशपांडे, नियतीच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत, मयुरा शिवलकर अंकिता गोजे उपस्थित होत्या. 

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पद्मश्री जोडट्टी, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी घेण्यात आलेल्या अंतिम फेरीत होम मिनिस्टर पुरस्कार स्मिता पाटील यांना मिळाला. द्वित्तीय क्रमांक  संज्योती धामणकर, तिसरा क्रमांक बिना कलानी यांना मिळाला.
 कुलकर्णी म्हणाल्या,  कौतुक सोहळा हा आपल्या आयुष्याला प्रेरणा देतो . साहित्त्यिक, राजकारणी यांच्याकडून शिकायला मिळते. मला अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ते पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी रंगीत तालीम घेतली जाते.त्यावेळेचे अनुभव वेगळे असतात. पद्मश्री सितव्वा जोडट्टी यांनी आपल्या कार्याबद्दल माहिती दिली. महिलांना सक्षम होण्याचे आवाहन केले.  
यावेळी विद्या हनबडी, संज्योती धामणेकर, प्राची कपूर, बिना कलानी, प्रिती नलावडे, विद्या तोपिनकट्टी, नंदिनी चौगुले, स्मिता पाटील आदी दहा स्पर्धकांमध्ये अंतिम फेरी पार पडली. 
कार्यक्रमाला माजी महापौर सरिता पाटील, रेणु मुतगेकर, माया कडोलकर, माजी महापौर विजय मोरे, डॉ. समीर सरनोबत, मोनाली शहा, अमित देसूरकर उपस्थित होते.