बेळगाव : रस्त्यावर फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद 

Last Updated: Mar 26 2020 2:57PM
Responsive image
संग्रहीत छायाचित्र


बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बुधवारी गुढीपाडव्यानिमित्त काहीशी सूट दिलेल्या पोलिसांनी गुरुवारी मात्र पुन्हा आपल्या दंडकास्त्राचा पुरेपूर वापर करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन असताना बेळगावात विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या तरुणांना व अन्य दुचाकीस्वारांना चांगलाच काठीचा प्रसाद मिळताना दिसून आला.

वाचा :बेळगावकरांनी उभारली कोरोनामुक्‍तीची गुढी

मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस देश लॉकडाऊनची घोषणा केली. दुसऱ्याच दिवशी बुधवारी पाडवा असल्यामुळे पोलिसही घरीच राहिले. शिवाय सणाच्या निमित्ताने रस्त्यावरील बंदोबस्त काहीसा हलका झाल्याने अनेकांनी घराबाहेर पडून रस्त्यावर गर्दी केल्याचे आढळून आले. परंतु, लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर पडू नका असा आदेश असताना बुधवारी फिरल्यामुळे गुरुवारीही आपल्याला फिरण्यास मुभा मिळेल, असा विचार करून घराबाहेर पडलेल्या वाहनचालकांना पोलिसांचा मार खावा लागला.

जीवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांना पोलिसांनी विचारणा करून सोडून दिले. परंतु विनाकारण घराबाहेर पडत फिरणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा शिकवला. काही तरुण पोलिसांचा मार चुकवण्यासाठी पळत असताना दुचाकीवर पडल्याचेही दिसून आले. चन्नम्मा सर्कल, बीम्स समोरील वाय जंक्शन, एपीएमसी कॉर्नर, गोगटे सर्कल, धर्मवीर संभाजी चौक, आरटीओ सर्कल यासह शहरातील अनेक मुख्य चौकांमध्ये पोलिसांनी वाहनधारकांना अडवून माघारी पाठवले. मुख्य चौकांमध्ये बॅरिकेट्स लावून काही रस्ते देखील बंद केले होते. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घरातून बाहेर पडू नये. अन्यथा त्यांना पोलिसांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा सज्जड इशारा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिला आहे.

वाचा :कानडी पोलिसांची निपाणीत घरात घुसून लोकांना मारहाण

कोरोना : मुंबईतील डॉक्टर, नर्सना राहण्यासाठी ताज हॉटेलमध्ये सोय


त्रुटी दूर करून तीन महिन्यांचे धान्य द्या : देवेंद्र फडणवीस


सांगली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी; मिरजेतील लॅबमध्ये २४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह


महाराष्ट्रावरचे कोरोना संकट दूर कर; जितेंद्र आव्हाड यांचे विठोबाला साकडे


पनवेल : सीआयएसएफचे ११ जवान कोरोना पाॅझिटिव्ह


उस्मानाबाद : उमरगासह लोहारा तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह 


गोव्यात अडकलेल्‍या नफीसा अलींना मुख्यमंत्री कार्यालयातून मदतीचा हात 


कोरोनामुक्त प्रिन्स चार्ल्स आणि आयुर्वेदाचे कनेक्शन राजघराण्याने फेटाळले 


अहमदनगर : 'त्या' १८ व्यक्ती तपासणीसाठी रुग्णालयात दाखल  


कोरोना : युरोपीय देशांच्या तुलनेत देशाची स्थिती चांगली; केंद्राचा दावा