होमपेज › Belgaon › निपानीत दोन अपघातात एक ठार, ४ गंभीर जखमी 

निपानीत दोन अपघातात एक ठार, ४ गंभीर जखमी 

Published On: Jan 29 2018 8:47AM | Last Updated: Jan 29 2018 8:47AMनिपानी : प्रतिनिधी

पुणे-बेंगळुरु राष्‍ट्रीय महामार्गावर यमगरनीजवळ रविवारी मध्यरात्री दोन ते सोमवारी पहाटे पाच या वेळेत झालेल्‍या वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही घटनेत चालकांचा ताबा सुटल्‍याने आयशर आणि ट्रक या दोन वाहनांचा अपघात झाला. 

घटप्रभा येथून कोल्‍हापूरकडे भाजीपाला घेहून जाणारा ट्रक पलटी झाला. यात चालकाचा जागीच मृत्‍यू झाला तर, ट्रकमधील महिला प्रवासी आणि चालकाचा साथिदार गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात स्‍टार हायवेजवळ झाला. 

यमगरनी नदीजवळ झालेल्‍या दुसऱ्या अपघातात पुण्याहून बेंगळुरुकडे जाणाऱ्या आयशरने दुभाजकाला धडक दिल्‍याने चालक आणि त्‍याचा साथिदार गंभीर जखमी झाले. अपघात घडताच रस्‍ते बांधकाम कंपनीच्या पुंजलॉईंड कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुकेरी यांच्यासह बसवेश्वर चौक पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेहून जखमींना उपचारासाठी जवळील सरकारी रूग्‍णालयात दाखल केले. 

दरम्‍यान, या अपघातांमुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.