निपाणी : प्रतिनिधी
चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे खा. प्रकाश हुक्केरी हे केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठ्या अपघातातून बचावले.
खा. हुक्केरी शुक्रवारी सकाळी बेळगांवहून सोलापूरकडे वूृहनमठ होटगी मठाचे योगी राजेंद्र शिवाचार्य यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी जात होते. सांगोल्याजवळ मंगलगड नजीक त्यांची इनोव्हा आली असता समोरून आलेल्या इनोव्हाने जोराची धडक दिल्याने खा. हुक्केरी यांच्या गाडीचा टायर फूटून त्यांची कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. सदर गाडीत खा. हुक्केरी यांच्यासह चालक प्रशांत जोडट्टी, महेश सातवार, गनमॅन पवनकुमार आवटी होते.
तर गनमॅन पवनकुमार व महेश सातवार यांना गंभीर दुखापत झाली आहे. समोरून आलेल्या इनोव्हा कार चालकाने अपघातानंतर कार सोडून पलायन केले. पण कांही काळानंतर पुन्हा तो घटनास्थळी हजर झाला. हा अपघात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना सीएनएस हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले.या घटनेची नोंद मंगळगड पोलिस ठाण्यात झाली आहे.