Thu, Nov 15, 2018 16:21होमपेज › Belgaon › कोगनोळी फाट्याजवळ अपघातात महिला ठार

कोगनोळी फाट्याजवळ अपघातात महिला ठार

Published On: Jan 31 2018 2:30PM | Last Updated: Jan 31 2018 2:30PMनिपाणी : प्रतिनिधी

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनुळी फाट्याजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शंकरवाडी (ता.कागल) येथील महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा पती या अपघातात गंभीर जखमी झाला. मकुबाई गजानन पाटील (वय ४०) मयत महिलेचे नाव आहे. तर गजानन नाथा पाटील जखमी पतीचे नाव आहे. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास झाला. अधिक तपास निपाणी ग्रामीण पोलिस करत आहेत.