Sat, Jun 06, 2020 19:31होमपेज › Belgaon › माणिकवाडीनजीक अपघातात बाप-लेक ठार

माणिकवाडीनजीक अपघातात बाप-लेक ठार

Published On: Jan 28 2018 1:40AM | Last Updated: Jan 28 2018 1:40AMखानापूर : प्रतिनिधी                                              

बेळगाव - गोवा महामार्गावरील माणिकवाडी गावानजीकच्या वळणावर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीची समोरुन येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या बसला जोराची धडक बसल्याने दुचाकीवरील बाप - लेक जागीच ठार झाले. बाबाजी आत्माराम पवार वय 35 आणि जनी बाबाजी पवार वय 6 दोघेही रा. मुंडवाड ता. खानापूर असे मृत्यूमुखी पडलेल्या बाप व मुलीचे नाव आहे.

आज सायंकाळी 7 च्या सुमारास हा अपघात घडला. बाबाजी , मुलगी जनी व अन्य एक जण दुचाकीवरून खानापूरहून गुंजीच्या दिशेने जात होते. यावेळी ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीची समोरून येणाऱ्या के. ए.  22 एफ  849 या बसला जबरदस्त टक्कर बसली. यात जनी व बाबाजी यांच्या डोक्याला व छातीत जबर मार लागून दोघेही जागीच ठार झाले. तर सुळकर पवार हा जखमी झाला. खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.