Tue, Nov 13, 2018 23:30होमपेज › Belgaon › अपघातात मुलाचा मृत्यू, वडील जखमी

अपघातात मुलाचा मृत्यू, वडील जखमी

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 10 2018 11:39PMबेळगाव : प्रतिनिधी

भरधाव वेगाने जाणार्‍या कारने महामार्गाशेजारी थांबलेल्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे वडील गंभीर जखमी आहेत. 

कोंडसकोप्प क्रॉसवर हा अपघात घडला. शशांक बसलिंगप्पा तळवार (वय 15, रा. बस्सापूर) असे मृताचे नाव आहे. तर दुचाकी चालक बसलिंगप्पा सन्नयल्लाप्पा तळवार (वय 48) हे गंभीर जखमी आहेत. बस्सापूर गावातून बसलिंगप्पा व मुलगा शशांक दुचाकीवरून बेळगावकडे येत होते. कोंडसकोप्प क्रॉसजवळील महामार्गाशेजारी रस्ता पार  करण्यासाठी उभारले असताना हिरेगाबागेवाडीकडून बेळगावकडे येणार्‍या कारने त्यांना  जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवर मागे बसलेल्या शशांकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच ठार झाला. नागराज बसलिंगप्पा तळवार यांनी हिरेबागेवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी, पोलिस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.