Sun, Feb 17, 2019 07:15होमपेज › Belgaon › भीषण अपघातात सहा ठार 

भीषण अपघातात सहा ठार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चित्रदुर्ग : प्रतिनिधी

मेटीकुर्के (ता.हिरीयूर)  येथे शनिवारी दोन कारची अमोरासमोरून टक्कर झाल्याने 6 जण जागीच ठार तर 7 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक कार बंगळूरहून येत होती. त्यावेळी कारचा एक टायर बर्स्ट झाल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटला व कार प्रथम दुभाजकाला आदळून विरुद्ध दिशेन येणार्‍या कारला आदळली. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. जखमींना सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. जखमीमध्ये चारजणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.