Mon, Mar 25, 2019 13:48होमपेज › Belgaon › ट्रकने बैलगाडीला उडवल्याने 9 ठार

ट्रकने बैलगाडीला उडवल्याने 9 ठार

Published On: Mar 11 2018 1:19AM | Last Updated: Mar 10 2018 11:41PMबागलकोट : प्रतिनिधी     

भरधाव ट्रकने बैलगाडीला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात बैलगाडीतील 9 जण ठार झाल्याची दुर्घटना बेळगाव?बागलकोट राष्ट्रीय महामार्ग 20 वरील रक्कसगी (ता.हुनगुंद) येथे शुक्रवारी रात्री घडली.

अपघातातील सर्व मृत रक्कसगी येथील असल्याचे समजते. चंद्रय्या हिरमेठ (वय 50), पत्नी रत्नव्वा (वय 40), मुलगी काशम्मा (वय 30), विजयालक्ष्मी चं. हिरेमठ (वय 23), सिद्दम्मा हूगार (वय 58), गंगम्मा हूगार (वय 55), बसम्मा गोरवर (वय 55) हे जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेले संगनबसप्पा हिरेमठ (वय 68) व गंगम्मा गौडर (वय 44) यांचा इस्पितळात उपचारापूर्वीच  मृत्यू झाला. शेतकरी कुटुंबातील हे सर्वजण तुरीची मळणी करून रक्कसगी येथील आपल्या घराकडे बैलगाडीतून येत असताना विरुद्ध दिशेने आलेला ट्रक बैलगाडीवर आदळला. अपघातात दोन बैलांचाही जागीच मृत्यू झाला. अमीनगड पोलिसांत अपघाताची नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.