Mon, May 20, 2019 22:43होमपेज › Belgaon › वाटेत अडवून पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण

वाटेत अडवून पोलिस कॉन्स्टेबलला मारहाण

Published On: Feb 04 2018 12:41PM | Last Updated: Feb 04 2018 12:44PMचिकोडी : प्रतिनिधी 


कामाला निघालेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलला अडवून १५ जणांनी एकत्र येऊन त्यांच्यावर हल्ला केला. दगड आणि काठीने त्यांना मारहाण केली. ही घटना रायबाग शहराबाहेर घडली. बिरप्पा पुजारी असे जखमी पालिसाचे नाव असुन त्यांचे वय ४१ आहे. 


चिकोडी रहदारी पोलीस स्थानकात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल पुजारी मायक्कादेवी यात्रेच्या बंदोबस्तासाठी चिंचणीला जात होते. दुचाकीवरून जात असताना रायबाग शहराबाहेर अडवून राजू पुजारी, संजू पुजारी, लकप्पा पुजारी, कुमार पुजारी, श्रीकांत पुजारी यांच्यासह १५ लोकांनी  दगड, लाठी काठीने हल्ला केले.


जखमी झालेले पोलिस पुजारी यांनी रायबाग पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असुन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  संपत्तीच्या वादातुन हा हल्ला नातेवाईकांनीच केला असल्याचे माहिती सुत्रांकडून मिळाली.