Wed, Aug 21, 2019 15:32होमपेज › Belgaon › युवराज शोधणार ‘उपोषणा’ला पर्याय...

युवराज शोधणार ‘उपोषणा’ला पर्याय...

Published On: Apr 12 2018 1:21AM | Last Updated: Apr 11 2018 11:28PMआज मात्र युवराजांची चांगलीच फिरकी घ्यायची असे मनोमन ठरवून बादशहा राजवाड्याच्या दुसर्‍या मजल्याच्या पायर्‍या चढत होते. जाताना स्वत:शीच हसत होते.

युवराज : असं लगबगीनं येणं होतंय...काही खास.
या अचानक आलेल्या आवाजाने बादशहांचे हसणे आपोआप विरले...  

बादशहा : कालचा विषय अर्ध्यावरच राहिला म्हटलं. आम्हाला मुद्यांची मुळीच कमतरता नाही. तुम्हाला मात्र ते भिंग लावून शोधावे लागतात. कारण उत्तरेत ते वापरून गुळगुळीत झालेत आता. दक्षिणेकडचं हवापाणी वेगळं आहे, असं नाही वाटत !

युवराज : हो, आहे ना! पण मीडिया देशभराचा असतो ना. त्यांना दक्षिण-उत्तर, पूर्व-पश्‍चिम अशी बंधनं नसतात. शिवाय आमचा राष्ट्रीय पक्ष. यामुळं देशपातळीवरील   विषय हाताळावे लागतात. बरं त्या त्या राज्याचा बारकाव्यानं अभ्यासही हवा. खबरे पुरवतील त्यावर भरवसा ठेवायचा म्हटलं की...

Tags :blog,Yuvaar, seek, alternative, fasting,belgaon news

बादशहा : हां, अगदी बरोबर बोललात. मागं नाही का अनुवादकानं आमच्या तोंडी आमच्याच आप्पाचं नाव घालून मीडियाला खाद्य पुरवलं होतं.
युवराज : अशी फसगत होऊ नये म्हणून आम्हीच काळजी वाहतो.  तुमचा अनुभव आम्हाला दक्ष करणारा.
थोडा विषय बदलत

बादशहा : आपलंं उपोषण छोले भटुरेनं ‘हायजॅक’ केलं. सार्‍या मीडियानं ती द‍ृश्यं पुरवली. आम्हाला खिल्‍ली उडवण्याची आयती संधी चालून आली. उपोषण करायचं ठरण्याआधी अण्णांचा सल्‍ला घ्यायचा होतात. उपोषण करणं तुमच्या रक्‍तातच नाही. कारण इतकी वर्षं आपण सत्तेत होता. म्हणून म्हटलं... 

युवराज : या मीडियाला काय  म्हणायच! नाश्ता घरी करण्याऐवजी हॉटेलात केला. त्यात काय एवढं? मीडियामुळंच उपोषण हायजॅक झालं. बिचार्‍या छोले भटुर्‍यांना का दोष द्यायचा. गरिबाघरची भाकरी खाल्‍ली असती तर इतकी नामुष्की न येती.

बादशहा : अशामुळं उपोषणाचं गांभीर्य मात्र हरवत चाललंय. मागं नाही का महाराष्ट्रातल्या दादांनी त्यांच्या एका ‘आगाऊ’ विधानाचा पश्‍चाताप म्हणून प्रीतिसंगमावर एक दिवसाचा उपवास केला. तेव्हापासून उपोषणाचं पावित्र्य नष्टच झालंय. उपवास याचा अर्थ ‘देवाच्या जवळ राहणं’ असा होतो. परंतु, राजकारणात या शब्दाचा पार चोथा झालाय. आधी अजीर्ण होईपर्यंत खादाडायचं आणि उपोषण करायचं, ही आता फॅशन होऊ पाहतेय. आपल्याला झाली ती विनाशकाले.....दुसरं काय?

युवराज : आम्हाला मान्य नाही. यामुळं का होई ना प्रसिद्धीच्या झोतात तर राहतोय ना! पण आता उपोषणाला भक्‍कम पर्याय शोधायला हवा. कारण हे अस्त्र आता जुनं झालंय, याची खात्री पटली आम्हाला. यासाठी विशेष बैठक बोलावून विचार मागवायला हवेत. युवराजांना कसे गुंतवले, या विचारात बादशहाही तेथून बाहेर पडले. -  सुनिल आपटे

Tags :blog,Yuvaar, seek, alternative, fasting