Thu, May 23, 2019 14:22
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › आर्थिक व्यवहारातून युवकाचे अपहरण 

आर्थिक व्यवहारातून युवकाचे अपहरण 

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:50PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

आर्थिक व्यवहारातून सुळेभावी येथील युवकाचे अपहरण झाल्याचे नाट्य उघडकीस आले असून त्याबद्दल पाचजणांना अटक झाली आहे. 

मारीहाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार  सुळेभावी येथील नागराज बसवराज परीट (वय 19, रा. सुळेभावी) याचे आर्थिक व्यवहारातून शनिवारी सायंकाळी अपहरण करण्यात आले होते. त्याला घेऊन  वाहनातून अपहरणकर्ते बेळगावला आले. मात्र, तासाभरानंतर नागराज त्यांच्या तावडीतून सुटून गावी पोहोचला. त्यानंतर त्याने मारीहाळ पोलिसांत तक्रार दाखल केली. आर्थिक कारणातून आपले अपहरण करण्यात आल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे. मात्र, आर्थिक व्यवहार काय होता, हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. 

तक्रारीनुसार पोलिसांनी महामार्गावर वाहनांची तपासणी मोहीम सुरू केली असता पाच अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती सापडले, अशी माहिती पोलिस निरीक्षक ज्योतिर्लिंग होनकट्टी यांनी दिली. विनायक वसंत परीट (वय 39, रा. विनायक कॉलनी), प्रमोद प्रभाकर याळगी (25, रा. वडगाव), प्रशांत देवण (32, रा.महाद्वार रोड), शाम पाटील (32, रा. विनायक कॉलनी) देवाप्पा कुकडोळी (21, रा. सुळेभावी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयासमोर हजर करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. संशयित कलम 143, 147, 364 ए, 506  सहकलम 149 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.