Wed, Nov 21, 2018 21:37होमपेज › Belgaon › कोडणी येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कोडणी येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

कोडणी येथील युवकाचा विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. अभिजीत अण्णाप्पा खोत (23) रा. खोतवाडी असे त्याचे नाव आहे. 

अभिजितचे बीईपर्यंतचे शिक्षण झाले होते. तो कागल एमआयडीसीतील एका कंपनीत कामाला होता. त्याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी बांधकामावर पाणी मारताना अभिजीतचा मोटारलगतच्या वायरवर पाय पडल्याने तो जोराने खाली कोसळला. त्याला तातडीने म. गांधी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

घटनेची माहिती समजताच माजी आ. काकासाहेब पाटील, माजी ता. पं. अध्यक्ष विनय अशोक पाटील यांनी रुग्णालयात जाऊन खोत कुटुंबीयांचे सांत्वन केेले. अभिजीतच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनेची नोंद ग्रामीण पोलिसात झाली आहे.


  •