Fri, Nov 16, 2018 11:46होमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी आज युवा मेळावा

सीमाप्रश्‍नी आज युवा मेळावा

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 12 2018 12:05AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

सीमालढ्याबाबत युवकांमध्ये जागृती करण्यासाठी म. ए. समितीच्या युवा आघाडीने बेनकनहळ्ळी येथे शुक्रवारी स. 11 वा. युवा मेळावा आयोजिला आहे. त्यानिमित्त तालुक्यातील युवाशक्‍ती एकवटणार आहे. खंडू डोईफोडे (बार्शी) व दिनेश ओऊळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

युवा आघाडीच्या माध्यमातून काही वर्षांपासून युवादिनी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी बेनकनहळ्ळी मेळावा आयोजित केला असून यावेळी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात येणार आहे. 
युवा मेळाव्यात शिवचरित्रावर खंडू डोईफोडे यांचे व्याख्यान होणार आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर लता पावशे मार्गदर्शन करणार आहेत, तर दिनेश ओऊळकर हे सीमाप्रश्‍नाबाबत युवकांना संबोधित करणार आहेत. गुणवंतांचा सत्कारदेखील मेळाव्यात होईल.