Fri, Jul 19, 2019 17:42होमपेज › Belgaon › रेल्वेच्या परीक्षेला जाताना तरुण ठार

रेल्वेच्या परीक्षेला जाताना तरुण ठार

Published On: Aug 30 2018 1:16AM | Last Updated: Aug 29 2018 11:55PMबेळगाव : प्रतिनिधी

बिडी (ता.खानापूर) येथे कार व ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात विनायक दशरथ  मराठे (वय 19, रा. बुदिहाळ, ता. गोकाक) हा तरुण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना बुधवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.  चव्हाट गल्‍ली, बेळगाव येथील निवृत्त पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण मराठे यांचा तो पुतण्या होय. दशरथ लक्ष्मण मराठे (वय 55), सुभाष बसवानी अरेर (42) अशी जखमींची नावे आहेत. 

विनायक हा हेल्मेट कंपनीमध्ये कामाला होता. त्याने रेल्वे खात्यात  नोकरीसाठी अर्ज केला होता.  गुरुवारी परीक्षा होती. यासाठी तो वडील दशरथ व मामा सुभाष यांना घेऊन कारने खानापूरमार्गे  धारवाडला जात असताना बिडीजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णवाहिकेतून बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र यात विनायकच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्‍तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. तर
 वडिल दशरथ व कारचालक  मामा सुभाष यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल  करण्यात आले आहे. घटनेची नोंद नंदगड पोलिस स्थानकात झाली आहे. मृत विनायकच्या पश्‍चात आई, वडिल, बहिणी , काका, काकु असा परिवार आहे. 

*एअरबॅग असूनही
सदर कार अत्याधुनिक असल्याने  अपघात होताक्षणीच सुरक्षेसाठी असणारी एअरबॅग उघडली जाते. पण तरीही या अपघातात विनायकचा बळी गेला.