Thu, Jun 20, 2019 01:11होमपेज › Belgaon › येडियुराप्पांनी केलेली बदली रद्द

येडियुराप्पांनी केलेली बदली रद्द

Published On: May 22 2018 1:16AM | Last Updated: May 21 2018 8:20PMबंगळूर : प्रतिनिधी

बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच बदली केलेले चिक्‍कमगळूरचे जिल्हा पोलीसप्रमुख के. अण्णामलाई यांची पुन्हा मूळ जागी बदली करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी येडियुराप्पांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अण्णामलाई यांची रामनगरला बदली केली होती. त्यामुळे अण्णामलाई यांनी सहाय्यक जिल्हा पोलीसप्रमुख गीता यांच्याकडे सूत्रे सोपवून रामनगरला प्रस्थान केले होते. मात्र येडियुराप्पांनी राजीनामा देताच बदलीचा आदेश मागे घेण्यात आला असून अण्णामलाई यांना पुन्हा चिक्‍कमगळूरला हजर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार सोमवारी अण्णामलाई यांनी पुन्हा चिक्‍कमगळूरचे पोलीसप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली.