Wed, Jul 24, 2019 12:14होमपेज › Belgaon › ‘बारावी’ साठी २३,५२० परीक्षार्थी

‘बारावी’ साठी २३,५२० परीक्षार्थी

Published On: Jan 07 2018 2:01AM | Last Updated: Jan 06 2018 11:10PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

बारावी परीक्षेसाठी पदवीपूर्व शिक्षण खात्याने संपूर्ण तयारी केली असून बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 23,520 परीक्षार्थी ही परीक्षा देणार आहेत. यासाठी एकूण 34 परीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर, सौंदत्ती, बैलहोंगल, कित्तूर या तालुक्यात परीक्षा घेण्याकरिता सर्व तयारी करण्यात आली आहे. 

यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या बारावीच्या वार्षिक परीक्षेकरिता एकूण 34 परीक्षा केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांपैकी 33 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. केवळ एका केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचे शिल्लक राहिले आहे. अध्याप विद्यार्थ्यांची संपूर्ण यादी तयार करण्यात आलेली नाही. मात्र, जानेवारीअखेरपर्यंत यादी तयार करून परीक्षा केंद्रांची संख्याही निश्‍चित करण्यात येणार आहे. असे पदवीपूर्व शिक्षण मंडळाचे संचालक कांबळे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात यावर्षी बारावी परीक्षेसाठी एकूण 23520 परीक्षार्थी असून यामध्ये खासगी 773, कायमस्वरूपी 18517 आणि फेरपरीक्षा देणारे 4215 या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आतापासूनच तयारी करण्यात आली असून पर्यवेक्षक व अन्य अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सर्व केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची परीक्षेअगोदर तपासणी करण्यात येणार आहे. याकरिता वेगळ्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत गैरप्रकार घडणार नाही. याची दखल घेण्यात आलेली आहे. येत्या आठवडाभरात जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बारावी परीक्षेसंदर्भात बैठक होणार असून त्या बैठकीवेळी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील किती विद्यार्थी परीक्षेला बसले जाणार आहेत. केंद्रे, पर्यवेक्षकांची संख्या जाहीर केली जाणार आहे.