Thu, Apr 25, 2019 07:27होमपेज › Belgaon › भौतिकशास्त्र परीक्षेत दिला चुकीचा प्रश्‍न

भौतिकशास्त्र परीक्षेत दिला चुकीचा प्रश्‍न

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 11:38PMबेळगाव : प्रतिनिधी

एक मार्चपासूनची बारावी परीक्षा सुरळीत सुरू झाली आहे. मात्र, शुक्रवारी परीक्षेच्या दुसर्‍या दिवशी भौतिकशास्त्र विषयात एक प्रश्‍न चुकीचा आल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. क्रमांक 31 हा प्रश्‍न चुकीचा आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. एन, यू, व्ही, क्यू, आर अशा इंग्रजी अक्षरांना भौतिकशास्त्रात काहीच अर्थ नाही. तरीही ‘त्या अक्षरांना निर्दिष्ट अर्थ आहे’ आणि क्यू या संज्ञेचा अर्थ विद्युत भार आहे असे मानून उत्तरे द्या, असा तो प्रश्‍न आहे. तथापि, विद्युत भार क्यू या अक्षराने दर्शवला जात नाही.

परिणामी, हा प्रश्‍नच चुकीचा असून, त्या प्रश्‍नाचे गुण सार्‍या विद्यार्थ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांनी शिक्षण आयुक्‍तांकडे इ-मेलद्वारे तक्रारही केली आहे. तसेच commissioner.pue@gmail.com या पत्त्यावर तक्रारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी बारावीच्या प्रश्‍नपत्रिका फुटल्या होत्या. यामुळे राज्य सरकारची नाचक्‍की होण्याबरोबरच तब्बल तीन वेळा फेरपरीक्षा घ्यावी लागली होती.